बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म

मुंबई | राज्यात सध्या सरकारी नोकर भरतीसाठी फाॅर्म भरले जात आहेत. आरोग्य भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, राज्यसेवा भरती या परीक्षा होणार आहेत. परिणामी विद्यार्थी तयारी करण्यात गुंतले आहेत. सर्वांच्या पसंतीची आणि राज्य सरकारची सर्वोच्च परीक्षा असणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी फाॅर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यसेवा जाहिरात क्रमांक 06/2021 राज्यसेवा परिक्षेसंदर्भातील परीक्षेसाठी फाॅर्म भरण्यास मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नविन जाहीर तारखेनूसार विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर 2021 दिवशी रात्री 11:59 पर्यंत फाॅर्म भरता येणार आहेत.

चलनाद्वारे शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बॅंकेमध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंतच शुल्क भरता येणार आहेत. त्यानंतर आलेल्या शुल्कांचा विचार आयोग करणार नाही, असं आयोगानं आपल्या नवीन पत्रकात म्हटलं आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यात सरकार नोकरभरती वेळेवर राबवत नाही, अशी सतत राज्य सरकारवर टीका होत होती. परिणामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं होतं. परिणामी आता आयोगाकडून पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं अंदाजे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या 

अफगाणिस्तानात खळबळ! ‘या’ स्टार खेळाडूची तालिबान्यांकडून हत्या

विराटनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सराव सामन्यात मिळाले संकेत

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

सोन्याच्या दरात 580 रुपयांची घट तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More