बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यापासून सगळीकडे त्याला ट्रोल केलं जात आहे. यातच राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर येत आहे.

राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर रायन याच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणात हळूहळू अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसत आहे. याशिवाय अनेक प्रसिद्ध लोकांची नावंही समोर येत आहेत.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आता त्याच्यात वाढ केली असून 14 दिवसांसाठी त्याला कोठडीत पाठवण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं या प्रकरणाचा साडेपाच महिने कसून तपास केला, अनेकांची चौकशी केली, त्यानंतर एकेक गोष्टींचा तपास केला. त्यातून या सगळ्याचा मास्टर माईंड हा राज कुंद्रा असल्याचं समोर आलं. अजून याप्रकरणात काय काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजप आमदाराला सोबत घेऊन राज्यपालांनी शासकीय दौरा करणं हे कितपत योग्य?”

पुरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी सरसावली पुढे; तब्बल 2.5 कोटींची मदत जाहीर

आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणतात…

राज कुंद्रा प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव आलं समोर

राज्यात पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More