बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

बीड | महाराष्ट्रात सध्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळतांना पाहायला मिळत आहेत. त्यातच बीडमधील केज तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसात येडेश्वरी साखर कारखान्यातील तब्बल 30 हजार पोते साखर भिजल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

येडेश्वरी कारखान्यातील गोदामामध्ये असलेल्या 30 हजार साखरेच्या गोण्या म्हणजेच तब्बल 15 हजार क्विंटल साखर पावसात भिजून मोठं नुकसान झालं आहे. केजमध्ये फक्त अर्ध्या तासात तब्बल 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जवळपास 50 कामगार गोदामातील पाणी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

येडेश्वरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हजार साखरेचे पोते पाण्याने भिजले असून हा आकडा 51 हजारांवर जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच यंदा केजमधील येडेश्वरी साखर कारखान्याने 06 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखर पॅक करून गोदामात ठेवली होती.

दरम्यान, मागच्या दोन दिवसात केज तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने 30 हजार होती पावसाच्या पाण्याने भिजल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

गजा मारणेवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारलं

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More