Top News विधानसभा निवडणूक 2019

गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती!

Loading...

मुंबई : लोकसभा निवडणुकीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना लागलेली गळती काही थांबण्याचं दिसत नाहीये. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपत प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाने तर तीन मेगाभरती घेत अनेक दिग्गज नेत्यांना भाजपत प्रवेश देत विरोधी पक्षांना जोरदार झटका दिला. आहे.

आता भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एक मेगाभरतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाची ही चौथी मेगाभरती 22 सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडणार आहे. मुंबईतील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही मेगाभरती होणार असल्याचं वृत्त आहे.

Loading...

राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. मात्र, शिवसेनेमुळे नारायण राणे यांचा भाजप प्रवेश रखडला असल्याचं बोललं जात आहे.

आता रविवारी होणाऱ्या भाजपच्या चौथ्या मेगाभरतीमध्ये नारायण राणे भाजपत प्रवेश करणार असल्याचं समजतय. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात झालेल्या भाजपच्या मेगाभरतीमध्ये तीन नेत्यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजत कुठल्या नेत्यांचा प्रवेश होतो हे पहावं लागेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या