अमरावती महाराष्ट्र

अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

अमरावती | अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाला धक्का देत नाशिक येथील अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत.

सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला, त्यामुळे अमरावती विभागात एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.

अमरावती विभागात भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना एका अपक्ष उमेदवाराने लढत दिल्याने त्यांना याबाबत चिंतन करावे लागेल, तर मी शैक्षणिक विभागात असलेल्या समस्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी दिली.

दरम्यान, किरण सरनाईक यांना 12433 मते मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत देशपांडे यांना 9191 मते मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या-

“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”

“एकट्याने लढण्याची चंद्रकांतदादांची खुमखुमी चांगलीच जिरली”

तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या