पाटणा | लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपने काहीतरी मोठा गेम खेळला आहे, असा संशय काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. पराभवानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालचा निकाल पाहता नक्कीच मोठा गेम झालाय. अर्थात हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही, असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मी अभिनंदन करतो. दोघेही उत्तम रणनितीकार आहेत. माझे जुने मित्र रविशंकर प्रसाद यांनाही शुभेच्छा. पाटणा आता ‘स्मार्ट सिटी’ बनेल अशी आशा करतो, असं म्हणत सिन्हा यांनी मोदींना सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणामधून तिकीट मिळालं होतं. सिन्हा आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यात चुरशीची लढत झाली.
महत्वाच्या बातम्या
-मोदी समर्थकाची अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी; अनुरागचा मोदींना सवाल
-मुहूर्त ठरला!!! या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव
-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!
-शिवसेनेच्या संभाव्य 4 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव
Comments are closed.