बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ममता बॅनर्जी जेव्हा सातवीत होत्या तेव्हा शरद पवार…”

मुंबई | देशात तिसऱ्या आघाडीचा पर्याय तयार करावा, या उद्देशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेतली. त्यावरून आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. (Nilesh Rane sharply criticized Sharad Pawar)

ममता बॅनर्जी जेव्हा 7 व्या इयत्तेत होत्या तेव्हा पहिल्यांदा शरद पवार साहेब आमदार झाले होते आणि आता ममता बॅनर्जीचे 221 आणि शरद पवारांचे 54 आमदार आहेत. नरेंद्र मोदी पहिल्यांदा आमदार आणि मुख्यमंत्री झालेले तेव्हा पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

आता नरेंद्र मोदी 2 वेळा पंतप्रधान आहेत आणि 304 खासदार देखील आहेत. मात्र, शरद पवार साहेबांकडे 4 खासदार आहेत, असं म्हणत निलेश राणे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. नितेश राणेंच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी होणार का, असा सवाल देखील आता उपस्थित होताना दिसतोय.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

“हा घ्या पुरावा, हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण”

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

“एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष…”, नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More