जीएसटी आम्हालाही समजेना, भाजप मंत्र्याकडून जाहीर कबुली

इंदौर | जीएसटीची प्रक्रिया मलाही ती अद्याप समजलेली नाही, अशी जाहीर कबुली भाजपच्याच एका मंत्र्याने दिलीय. ओम प्रकाश ध्रुवे असं या मंत्र्याचं नावं असून ते मध्य प्रदेश सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री आहेत.

नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मोठमोठे व्यापारी, सीए यांना जीएसटी समजू शकलेलं नाही, मलाही ते कळालेली नाही, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. सध्या अवघड वाटणाऱ्या प्रणालीची प्रक्रिया हळू-हळू समजेल, असं वक्तव्य त्यांनी केलं

दरम्यान, ध्रुवे यांच्या वक्तव्यावरून जीएसटीवर टीका करण्यासाठी विरोधी पक्षाला बळ मिळालंय.