डेहराडून | नेहमी आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हरिद्वारच्या एका सभेत त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी या राक्षस हिरण्यकश्यपू घराण्यातील आहेत, असं म्हणत साक्षी महाराजांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.
पश्चिम बंगालचं नाव ऐकताच मला त्रेता युगाची आठवण येते. जेव्हा भक्त प्रल्हादाने जेव्हा ‘जय श्री राम’ अशा घोषणा दिल्या तेव्हा त्याचे वडील राक्षस हिरण्यकश्यपूने शिक्षा दिली, तरुंगात टाकले. ममताही असंच करत आहेत.
‘जय श्री राम’च्या घोषणा देतात म्हणून ममता बॅनर्जी लोकांना तुरुंगात टाकत आहेत. यावरुन त्या हिरण्यकश्यपू्च्या घरातील तर नाही ना?, असा सवाल साक्षी महाराजांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-हवामान खात्याचा अंदाज तर चुकू द्या, कार्यालयाला टाळेच ठोकतो; संतप्त शेतकरी…
-जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारवर बलात्काराचा आरोप
-जमाव हत्येच्या नावाने मुस्लीमांच्या हत्या होतात- सपा खासदार
-नितीश कुमार यांचं मोदी आणि भाजपला जशास तसं प्रत्युत्तर!
-मोदी-राहुल गांधींच्या नावानं विनोद करणं पडलं महागात; खेळणी विक्रेत्याला अटक
Comments are closed.