भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

मुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणारच, असा युतीबाबतचा पुनरूच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

भाजप शिवसेना युती करून आगामी दोन्ही निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पाच राज्यात जरी आमचा पराभव झाला असला, तरी आगामी लोकसभा निवडणुकीची परिस्थिती वेगळी असणार आहे. आम्ही जनतेसमोर विकासकामे घेऊन जाणार आहोत, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

पाच राज्यांत झालेल्या दारूण पराभवाचा भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळेच की काय, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे युतीबाबत पुनरूच्चार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

“‘हर हर मोदी, घर घर मोदी’ नारा देणाऱ्या मोदी सरकारला शेवटची घरघर”

-लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू; उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक

-स्वतःला वाचवण्यासाठी मोदींनी सर्वोच्च न्यायालयाला फसवले- काँग्रेस

-शिवसेना-भाजप एकत्र आले तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकेल!

-कोण होणार अहमदनगरचा महापौर?; शिवसेनेचे रामदास कदम ठरवणार…