Top News राजकारण विदेश

भारतासह ‘या’ दोन देशांमध्येही भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा

Photo Courtesy- Instagram/@amitshahofficial

आगरतळा | या ना त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे आसामचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी आणखी एक अजब वक्तव्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करण्याची योजना असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

२०१८ मध्ये अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना शासकीय विश्रामगृहात झालेल्या चर्चेत आपण देशातील जवळपास सर्वच राज्यात सत्ता स्थापन केली आहे, आता फक्त शेजारील नेपाळ आणि श्रीलंका राहिल्याचे शहांनी बोलून दाखवलं असल्याचं आगरतळा येथे आयोजित एका कार्यक्रमात विप्लव देव यांनी सांगितलं.

बऱ्याच वेळा गम्मत म्हणून वापरण्यात येणारे हे वक्तव्य थेट भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीच केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विप्लव देव कायम आपल्या अशाच अजब वक्तव्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात.

अमित शाह यांनी खरंच असे वक्तव्य केले, की नेहमी प्रमाणेच देव यांनी प्रसिद्धीसाठी असे जाहीरपणे बोलून दाखवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेटकऱ्यांनी मात्र या वक्तव्याला हसण्यावारी नेल्याचे समजते. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव करेल असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या-

न्यायव्यवस्था खरंच जीर्ण झालीय का?; शरद पवार म्हणतात…

महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!

प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!

IPLच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं दाखवला चमत्कार, एका षटकात 5 षटकार!

उडता रहाणे! मराठमोळ्या अजिंक्यचा झेल सर्वांना अचंबित करणारा, पाहा व्हिडीओ

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या