बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आरोप प्रत्यारोपाच्या या फैरी सुरू असतानाच या वादात नवाब मलिक यांच्या मुलीनेही उडी घेतली आहे. निलोफर मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. या पत्रिकेत वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे लिहिलं असल्याचं दिसत आहे.

7 डिसेंबर 2006 समीर वानखेडे यांचा शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाला आहे. या विवाहाच्या पत्रिकेत समीर वानखेडे यांचा दाऊद व जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असा उल्लेख आहे. निलोफर बरोबरच नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना मलिक शेख यांनी देखील समीर वानखेडेंचा विवाह दाखला शेअर केला आहे. या दाखल्यात यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचं दिसत आहे.

याआधी देखील समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. त्यावेळी वानखेडेंनी त्यांना पत्राद्वारे उत्तर दिलं होतं. माझ्या कुटुंबाची खोटी माहिती सोशल मीडियावर टाकून मला वैयक्तिकरित्या मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचं वानखेडे म्हणाले होते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधी चुकीचा वागलेलो नाही, माझ्यावरचे आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याची साक्ष वानखेडेंनी कोर्टाला दिली होती.

दरम्यान, नवाब मलिकांच्या मुलींनी शेअर केलेल्या निमंत्रण पत्रिकेबद्दल वानखेडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ही निमंत्रण पत्रिका आपली नसून पत्नीच्या घरच्यांची आहे, असं वानखेडे म्हणाले. त्यात काय छापले आहे हे मला माहित नाही, असा दावाही समीर वानखेडेंनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More