बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर वातावरण चांगलंच तापलं आहे. निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर यासंदर्भात हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

#bycottkarnjohrgangmovie असा हॅशटॅग वापरुन लोक व्यक्त होत आहेत. करण जोहर तसेच त्याच्या गँगविरोधात लोकांमध्ये रोष असल्याचं पहायला मिळतंय. तसेच #KaranJohar हा हॅशटॅग देखील ट्रेंड होतोय, याशिवाय आलिया भटला देखील ट्रोल केलं जातंय.

स्टार किड नसल्याने सुशांतसिंग राजपूतला बॉलिवूडमध्ये विरोधाचा सामना करावा लागला, त्यातूनच आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा अनेकांनी केलाय. अभिनेत्री कंगणा राणावत, कुस्तीपटू बबिता फोगट, अभिनेते दिग्दर्शक शेखर कपूर यांनी यासंदर्भात केलेल्या पोस्ट लक्षवेधी आहेत.

सुशांतसिंग स्टार किड नाही. ज्यांना बॉलिवूडचा वारसा नाही अशा लोकांना सपोर्ट केला जात नाही. त्यांचे चित्रपट चालणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि अशा लोकांना बॉलिवूडबाहेर फेकले जाते, असे आरोप आता होऊ लागले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!

सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार

महत्वाच्या बातम्या-

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

चॅटचा ‘तो’ स्क्रीनशॉर्ट शेअर करत अर्जुन कपूरने सुशांतला वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More