बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुबंई | शिवसेना आणि शिंदे गटात बोलणी व्हावी अशी इच्छा अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यांनंतर यासाठी दिपाली सय्यद यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसोबत परत यावं असं म्हटलं होतं. अगदीच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होणार असल्याचं ट्विटही त्यांनी केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी एक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई दिवसेंदिवस वाढत आहे. आज सर्वाच्च न्यायालाचा निकाल होता. यावर आज कोर्टात सुनावणी होती. हे प्रकरण खंडपीठाकडे जाण्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली आहे. तसेच यासाठी न्यायालयाने 1 ऑगस्टला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. यासंबधी बोलताना दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.

अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार-खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही. आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल. याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र !, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी करत पुन्हा एकदा शिंदे-ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

शिंदेंच्या बंडानंतर आक्रमक होत शिंदेंना गटनेतेपदावरून काढून टाकलं होतं. यानंतर कोठेतरी दूर बसून मी नेता आहे, असं सांगणं कितपत योग्य आहे, असा युक्तीवाद वकील कपिल सिब्बल यांनी केला. ते सध्या ठाकरेंच्या बाजूने केस लढवत आहेत.

थोडक्यात बातम्या

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”

मोठी बातमी! नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय!

शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More