Top News खेळ

मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!

मेलबर्न | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झालीये. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करतोय. याच वेळी पुन्हा एकदा रहाणे कृतीने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल खेळी केलीये. कसोटी पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मार्नस लॅब्यूशेनला 48 धावांवर सिराजने बाद करत मोठा अडथळा दूर केला.

यावेळी दुसरं सेशन संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जात असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने सिराजकडे भारतीय संघाला लीड करण्याची संधी सोपवली. रहाणेच्या या कृत्याने सिराजचा एका अर्थाने सन्मानंच करण्यात आला. रहाणेच्या या कृतीने लोकांची मनं जिंकलीयेत.

यापूर्वी देखील अफगाणिस्तानच्या टीमसोबत कसोटी सामना जिंकल्यावर रहाणेच्या खिलाडूवृत्तीचं दर्शन झालं होतं. त्यावेळी रहाणे कर्णधार असताना भारताने सामना जिंकल्यानंतर त्याने अफगाणिस्तानच्या संघाला फोटो काढताना सोबत घेतलं होतं.

थोडक्यात बातम्या-

विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी!

लठ्ठ व्यक्तींनो वेळीच सावध व्हा; संशोधनातून समोर आला मोठा धोका!

रामाला मानणारे वचन कसे मोडतात- अण्णा हजारे

“अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा आणि त्यांच्या जागेवर…”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या