बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सीबीएसई बोर्डाच्या मार्किंग पद्धतीला विद्यार्थ्यांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

नवी दिल्ली | सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या निकालाबाबत नुकतीच मोठी घोषणा केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 20 जुलैला तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार असल्याचं बोर्डाने सांगितलं आहे. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठीचे सूत्र देखील आज जाहीर केले आहे. मात्र, बोर्डाने जाहीर केलेल्या मूल्यमापनाच्या सुत्रावर बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे.

सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या मुल्यमापनाच्या सुत्रावर प्रश्न उपस्थित करत 1152 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या विद्यार्थ्यांनी अॅडव्होकेट मनू जेटली यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत कंपार्टमेंट, मागील कित्येक वर्षांपासून पास होण्याच्या आशेने परिक्षा देणारे विद्यार्थी, ड्रॉपआऊट, तसेच खासगी विद्यार्थ्यांसाठी देखील एक धोरण बनवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

दरम्यान, सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठी 40:30:30 हा फॉर्म्युला जाहीर केला आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांचं मुल्यमापन होईल. 40:30:30 हा फॉर्म्युला कसा असेल याविषयी देखील बोर्डाने माहिती दिली आहे.

दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येतील. यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर 30 टक्के गुण अकरावीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित असतील. तर उरलेले 40 टक्के गुण बारावीत घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांच्या गुणांवर देण्यात येतील.

थोडक्यात बातम्या-

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

2024 मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“अजित पवारांकडे 10 सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More