बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत हे गडकरींनाच काय अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात”

पंढरपूर | बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका, असा सल्ला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी नितीन गडकरींना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांचं कसं आहे, की अमेरिका, इंग्लंड, बेळगांव हे त्यांना माहिती असतं. आम्ही सामान्य माणसं आहोत. संजय राऊत ते कोणालाही सल्ला देऊ शकतात. अमेरिकेच्या, इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देतात, तर ते गडकरींनाही देऊ सल्ला शकतात, असा टोला चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.

अहंकार कधी दाखवू नये. कालचक्र नेहमी फिरत असतं. पंधरा वर्ष त्यांचं सरकार होतं, मग आमचं आलं, पुन्हा त्यांचं आलं, पुन्हा आमचं गेलं, त्यांचं आलं, त्यांना नीट माहिती आहे की सरकार केव्हा जाणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याकरता अशी धडपड त्यांना करावी लागते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांवर देखील निशाणा साधला. जयंत पाटील यांचे स्वप्नरंजन आहे. अठरा महिने झाले, ते सांगत आहेत की आमच्याकडून गेलेले परत येणार आहेत, परत येणार आहेत. दिवसा स्वप्नं पाहायला कुणाला अडचण नसते. मात्र भाजप पूर्वीपेक्षाही जबरदस्त होत चाललेली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

थोडक्यात बातम्या- 

“मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, नाहीतर…”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

कडक सॅल्यूट! डॉक्टरचा मनाला भिडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

रेमडेसिवीर मिळेना; हतबल आमदार महेश लांडगेंनी मागितली जनतेची माफी

‘त्यांना त्यांची जागा दाखवून द्या’; अमोल कोल्हे भाजप नेत्यांवर बरसले

गर्दी झाली तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More