बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस आतापर्यंत झोपले होते का?- चंद्रकांत पाटील

मुंबई | अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असं या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून अमित शहांची महाविकासआघाडीवर टीका म्हणाले…

‘अल्प बुद्धी दिसतेच आहे’; अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

“मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र उधळून लावूया”

स्मृती इराणींसाठी मोदी सरकारने मोडला कायदा; राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती परस्पर केली रद्द!

अर्णब गोस्वामींच्या अटकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More