बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”

मुंबई | मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय यंत्रणेच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता अनिल देशमुखांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप सचिन वाझे यांनी  पत्र लिहुन केले आहे.

सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी कामावर रूजू होण्यासाठी 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी महापालिका कंत्राटदाराकडुन प्रत्येकी 2 कोटी वसुल करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता अनिल देशमुख यांच्यासहपरिवहन मंत्री अनिल परब  यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच पार्श्वभुमीवर आता ‘अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?’ असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून विचारला आहे.

सचिन वाझे याने अनिल परब यांचं नाव घेतल्यानंतर स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ‘मी माझ्या दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचा हा कट आहे.’ मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केलं.

थोडक्यात बातम्या

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!

नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय सांगितलं?; साऱ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उघड

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More