विधान परिषदेसाठी भाजपचं अखेर मातोश्रीला साकडं!

मुंबई | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपला अखेर मातोश्रीला साकडं घालण्याची वेळ आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. 

येत्या 7 डिसेंबरला विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होतेय. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी हे दोन नेते मातोश्रीवर पोहोचलेत. 

दरम्यान, शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने नारायण राणेंची उमेदवारी गुंडाळल्याचं कळतंय. भाजपचे नेते मातोश्रीवर दाखल झाल्यानं या वृत्ताला दुजोरा मिळाल्यात जमा आहे.