‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
मुंबई | भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान चांगलाच राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीने (NCP) स्मृती ईराणींविरोधात छेडलेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. या घटनेनंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरलं. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल अशी अपेक्षा होती. मात्र, आपणच अशा संस्कृतीला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असा घणाघात रोहित पवारांनी केला होता.
रोहित पवारांच्या या टीकेवर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे. रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कोणत्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे.
दरम्यान, वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा जेष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रूजवली की त्यामागे दुसराच ‘हात’ आहे?, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी ट्विट करत रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या @PawarSpeaks यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? https://t.co/sHVpYezUDh
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 17, 2022
थोडक्यात बातम्या-
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मुंबई महापौरपद कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
“…तर मी स्वत: त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन”
रोहित पवारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला, म्हणाले…
Comments are closed.