पुणे महाराष्ट्र

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा”

Photo Credit- Chandrakant Patil Facebook Page

पुणे | संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिर निर्माणासाठी नव्हे तर एका राजकीय पक्षासाठी निधी गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.

मला काँग्रेसच्या या आरोपांबद्दल जराही आश्चर्य वाटलं नाही. कारण, संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

राम जन्मभूमी ट्रस्टवर आरोप करण्यापूर्वी आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला विचारला.

थोडक्यात बातम्या-

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

अभिनेत्री कंगणा राणावत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

60 वर्षांपासून गुहेत वास्तव्य; राम मंदिरासाठी दान केलेली रक्कम ऐकाल तर हैराण व्हाल!

सातव्या बैठकीत ‘अण्णांचा हट्ट’ मागे; फडणवीसांच्या भेटीनंतर उपोषणाआधीच माघार

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या