बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. सोशल माध्यमांवर काही फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरत संजय राठोडांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता राठोडांनी राजीनामा दिल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच पाटलांनी यावेळी बोलताना पाटलांनी शरद पवारांना टोला लगावला.

जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. याआधी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केले होते. मात्र संबंधित तरूणीने आरोप मागे घेतले त्यानंतर ते प्रकरण शांत झालं. त्यावेळीही भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

दरम्यान, आम्ही अधिवेशनात इतर मुद्दयांवरून आवाज उठवणार आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्यावरही आम्ही आवाज उठवणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

संजय राठोडांना आणखी एक मोठा धक्का, पूजाच्या कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती तक्रार करण्यास आली पुढे!

सर्वात मोठी बातमी, अखेर संजय राठोडांनी राजीनामा दिला

पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून नीलम गोऱ्हे टार्गेट; ताई लवकर या आणि भूमिका घ्या

संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका, नाहीतर… पोहरादेवीच्या महंतांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा

पुण्यात शाळा, महाविद्यालये ‘या’ तारखेपर्यंत बंद; वाचा महापालिका आयुक्तांचा नवा आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More