पुणे | जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन पैलवान एकत्र आले तरी आम्हीच पुण्याची महापालिका जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणात केंद्र सरकारचा काही रोल नाही. हा राज्याचा विषय आहे. विरोदी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जो बदल केला आहे तो बदल केंद्राने कायदा करण्याच्या अगोदर केला असल्याचं पाटील म्हणाले.
10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देण्याव्यतिरिक्त केंद्राचा यात काहीही रोल नाही. हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना माहित आहे. असं असताना सुद्धा हे केंद्राकडे ढकलत असल्याचंही पाटील म्हणाले. यावेळी पाटलांनी केंद्राच्या कृषी कायद्यांना मिळालेल्या स्थगितीवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, तिन्ही कायद्यांची समीक्षा करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आयोग, हायकोर्ट, ईडी, सुप्रीम कोर्ट या सर्व संविधानिक व्यवस्था आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नसल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार पोलिसांनी नाकारली; रेणू शर्मा यांचं पोलीस आयुक्तांना पत्र
धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक म्हणाले…
“…तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही
“मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप”
कोरोना विरोधातील लढाईत नरेंद्र मोदी यांचं काम जगात सर्वोत्तम- देवेंद्र फडणवीस