मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या निवडणुकीपूर्वी आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तरी विजय आमचाच होणार आहे. पण प्रत्यक्षात त्यांना सहापैकी केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच भाजपचे बालेकिल्ले असलेले पुणे आणि नगापूरचे मतदारसंघदेखील त्यांनी या निवडणुकीत गमावले. यावरुन शिवसेनेने चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चंद्रकांत पाटलांची होती, ती चांगलीच जिरली आहे, असा टोला शिवसेनेने चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपचा समाचार घेतलाय.
पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला. पुणे पदवीधर, शिक्षक हा तसा पांढरपेशांचा मतदारसंघ पण बहुधा सदाशिव पेठ, कसबा पेठ, कोथरूड, नाना पेठ, डेक्कन परिसरांतील मतदारांनीही चंद्रकांतदादांच्या आवाहनास झिडकारलेले दिसते, अशी टीका शिवसेनेनं केली.
कोल्हापूर, सातारा, सांगलीचा तर प्रश्नच येत नाही, असे एकंदरीत मतदान झालेले दिसले. आता चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यास जतन आणि संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून 50 लाख रुपये जाहीर!
राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप
“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!