बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. महाविकास आघाडीे (MVA Government) आणि भाजप (BJP) दोन्हीकडील नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. राज्यात घडणाऱ्या विविध घटनांवरून पाटील यांनी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

आपला मनमानी कारभार आणि जनतेच्या समस्या यांची विधीमंडळात चर्चा होऊ नये, तसेच अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाऊ नयेत यासाठी कमीतकमी दिवसांचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने आखले आहे. आपण पदोपदी लोकशाही पायदळी तुडवत आहोत याची या सरकारला जराही शरम वाटत नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

ठाकरे सरकार रोखशाही आणि रोकशाही सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, संप, आंदोलने जितक्या प्रमाणात होत आहे, तितकी यापूर्वी कधीही झाली नव्हती. या सरकारच्या मनमानी कारभारामुळेच महाराष्ट्रात प्रत्येक समाजघटकावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी जहरी टीका पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या आदल्यादिवशी सरकारतर्फे आयोजित चहापानावर विरोधी पक्ष भाजपनं बहिष्कार टाकलेला पहायला मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अधिवेशनात घेरण्याचा इशारा दिला आहे.

थोडक्यात बातम्या 

सावधान! गुगलवर ‘या’ 5 गोष्टी शोधाल तर थेट जेलमध्ये जाल

पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रुपये

“इथं कोणी ‘शहेनशहा’ टिकला नाही तर बाकी ‘शहांची’ काय गोष्ट”

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; ‘या’ 10 मुद्द्यावरून अधिवशेन गाजणार?

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More