बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नईचा राजस्थानवर सुपर विजय, गुणतालिकेत घेतली भरारी

मुंबई | आयपीएलच्या चेन्नई सुपर किंंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने सुपर विजय मिळवला आहे. चेन्नईने ठेवलेल्या 189 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 143 रनपर्यंतच मजल मारता आली.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला मनन व्होराच्या रुपात पहिला धक्का बसला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यावेळी फक्त एकाच धावेवर बाद झाला हा राजस्थानसाठी मोठा धक्का होता. पण त्यानंतर जोस बटलरने एक बाजू लावून धरली होता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बटलर आऊट झाला. रवींद्र जडेजाने यावेळी बटलरने त्रिफळाचीत केलं. बटलरचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकलं.

अगोदर फलंदाजी करताना ऋतुराज लवकर बाद झाला. त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिसने धडेकाबाज फलंदजाी केल्याचे पाहायला मिळाले. फॅफने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. फॅफने यावेळी 17 चेंडूंत 33 धावा केल्या, यामध्ये चार चौकार आणि दोव षटाकारांचा समावेश होता. फॅफ बाद झाल्यावर मोइन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चांगली फलंदाजी केली. पण या तिघांनाही यावेळी मोठी धासंख्या साकारता आली नाही.

दरम्यान, या विजयबरोबर चेन्नईने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी व्हायला सुरुवात, पाहा आजची आकडेवारी

‘देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मंत्री लेडीज बारमध्ये जातात’; संजय गायकवाडांचा पलटवार

24 तासात एकाच कुटुंबातील 3 भावांचा मृत्यू, कोरोना चाचणी आली निगेटिव्ह

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय, किराणा खरेदीसाठी दिलेली वेळ बदलली!

‘नॉटी जमात’ म्हणत अमृता फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More