पुणे महाराष्ट्र

महानगरपालिकेच्या कार्यक्रमातही भाजप राजकारण करत आहे!

पुणे | महापालिकेच्या कार्यक्रमातही भाजप राजकारण करीत आहे, उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्याने काही संकेत पाळणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले, असं वक्तव्य महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केलं.

विरोधकांना गृहीत धरले जात नाही, महापालिकेचे कार्यक्रमदेखील सत्ताधारी भाजपा मिरविण्यासाठी करतात, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान, या कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. एका निमंत्रणपत्रिकेत पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख होता, मात्र दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेवर फक्त भाजपच्याच नेत्यांची नावे होती. पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत विरोधकांना डावललं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-उपराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी थांबलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक!

-फडणवीसांसोबत उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणं पवारांनी टाळलं

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ

-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या