बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी; छगन भुजबळांची मागणी

मुंबई | ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हाही याबाबत विधानसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

वंचितांच्या मदतीसाठी जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे. स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होत नसल्याने ओबीसींसमोर अनेक अडचणी येत आहेत, असं भुजबळ म्हणाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावर भाष्य केलं. आज फडणवीससाहेब आपल्या सोबत आहेत, ओबीसी जनगणनेला त्यांची साथ आहे, केंद्राची साथ नसली तरी आपण महाराष्ट्रात ओबीसी जनगणना करुन देशाला दाखवून देऊ, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र हे जगातील पहिलं राज्य आहे, ज्यामध्ये शाहू महाराजांनी वंचित घटकांना पहिल्यांदा आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले होते. याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी करुन दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

‘सर्व मोदी चोर आहेत’ वक्तव्यावर राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा

फडणवीसांच्या काळात सिडकोत घोटाळा झाल्याचा आरोप, कॅगचा ठपका?

महत्वाच्या बातम्या-

इतिहासात एकाही हिंदू राजाने मस्जिद तोडली नाही- नितीन गडकरी

देशात जे काही होत आहे त्याला आपणच जबाबदार- मोहन भागवत

इंदोरीकरांसमोरील अडचणी थांबेनात; कार्यक्रम उधळून लावण्याचा संघटनांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More