अभिनेत्री चिन्मयी सुमितसमोर हस्तमैथुन करण्याचा प्रयत्न

मुंबई | महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी घटना मुंबईत पुन्हा एकदा घडलीय. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर अश्लील चाळे करण्यात आलेत. 

मुंबईतील विलेपार्ले भागातील टिळक शाळेजवळ हा प्रकार घडला. चिन्मयी यांचे पती आणि अभिनेते सुमित राघवन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. 

अश्लील चाळे करणारी व्यक्ती बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर आहे. त्याच्या कारचे शेवटचे 4 नंबर 1985 आहे याआधारे पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घ्यावा, असं आवाहन सुमितनं मुंबई पोलिसांना केलं आहे.