बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

मुंबई | राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील सहा वर्षानंतर दारूबंदी उठवण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. दारूबंदीमुळे अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारी जिल्ह्यात बोकाळली होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आलं असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.

क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार. इस आश्वासन का?, यवतमाळ राहिलं दूर, चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल, असं चित्रा वाघ म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  जयंत पाटलांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये विधानसभेत यवतमाळच्या दारूबंदीवर जयंत पाटील बोलताना दिसत आहेत.

कालच मला स्वामिनी जिल्हा दारूबंदी आंदोलनाच्या काही भगिनी भेटल्या. त्यांची मागणी काय होती, यवतमाळमध्ये दारूबंदी करा. आम्ही मध्ये संघर्ष यात्रा केली. त्यावेळी त्या भेटल्या आणि म्हणाल्या दारूबंदी करा. मी त्यांना सांगितलेलं आहे, सुधीरभाऊ करतात की नाही ते बघा. नाही तर आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या यवतमाळ जिल्ह्याची दारुबंदी करू. हे आश्वासन मी त्यांना दिलं आहे, लिहून घ्या. चंद्रपूरला दारुबंदी होते, त्या महिलांचा साधा प्रश्न आहे की यवतमाळला का होत नाही? आणि सुधीरभाऊ राज्याचे अर्थमंत्री असताना दारुबंदी का होत नाही?, असा सवाल पाटील यांनी केला होता.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

कीडाप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ देशात पार पडणार आयपीएलचे उर्वरित सामने

डॉक्टर दाम्पत्याचा दिवसाढवळ्या भररस्यात गोळ्या घालून केला खून, पाहा व्हिडीओ

महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली अन्…; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More