बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बायकोनंच दिली नवऱ्याची सुपारी, पोलीस तपासात समजलं अत्यंत धक्कादायक कारण

नवी दिल्ली | प्रेमासाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा काही अंदाज नाही. हल्ली लग्नानंतर होणाऱ्या प्रेमसंबंधामुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, रोज कुठे ना कुठे काही ना काही घटना घडताना दिसत आहेत. राजस्थानच्या उदयपुरात देखील पोलिसांनी अशाच एका घटनेचा शोध लावला असून मृतकाच्या पत्नीला आणि तिच्या मोठ्या दिराला अटक केली आहे.

दिरासोबत अवैध संबंध असलेल्या महिलेने स्वत: च्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष पोलिस पथकाच्या तपासणीमुळे या प्रकरणाचा खुलासा तब्बल ५ महिन्यानंतर तोही आश्चर्यकारक रित्या झाला आहे.

वास्तविक, हे प्रकरण उदयपूर शहरातील प्रतापनगर पोलिस स्टेशनच्या क्षेत्रात घडलं आहे.  समारे ५ महिन्यांपूर्वी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिरासह, मृताची पत्नी आणि या प्रकरणात सामील झालेल्या इतर पाच आरोपींना अटक केली आहे. एसपी डॉ. राजीव पचार यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाचे कॉन्स्टेबल प्रल्हाद पाटीदार यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. एका मृत माणसांचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी काही लोक गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतमध्ये फेऱ्या मारत आहेत, अशी माहिती होती.  या पथकाने दोन लोकांवर नजर ठेवली असता एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांना बनावट मृत्यू प्रमाणपत्र हवं असल्याची बाब समोर आली.

पोलिसांच्या या टीमने जेव्हा दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्या केलेल्या चौकशीत त्यांनी धक्कादायक बाबी कबूल केल्या. आपल्या अन्य ३ साथीदारांसोबत आपण एकाची हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं. आरोपींनी यासाठी त्रिपुराच्या प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती. स्पेशल टीम आणि प्रतापनगर पोलिसांनी जेव्हा या गोष्टींचा घटनाक्रम लावला तेव्हा अत्यंत धक्कादायक निष्कर्षापर्यंत ते पोहोचले.

या प्रकरणात मृताचा मोठा भाऊ तपनदास आणि मृताची पत्नी यांच्यात अवैध संबंध उघडकीस आले आहेत. या हत्याकांडातील मास्टरमाईंड असलेले मृतकाची पत्नी आणि मोठ्या भावालाही पोलिस पथकाने अटक केली आहे. एसपी राजीव पचार यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान उत्तम दासच्या मोठ्या भावाने अर्थात तपन दासनेच त्याला सुपारी देऊन ठार मारल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या लोकांनी उत्तम दासची हत्या केल्यानंतर गावात जाऊन कोरोनामुळे त्याच्या मृत्यू झाल्याचं कारण सांगितलं होतं. तसेच यानंतर मृतकाचे करतात ते सर्व विधीही करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मृताची पत्नी, मोठा भाऊ आणि उदयपूर येथूल 5 लोकांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यवसाय करणाऱ्या उत्तम दासची कंपनी आहे, ज्याची वार्षिक उलाढाल पाच कोटी रुपये आहे. उत्तमने आपल्या कंपनीमार्फत राजस्थानच्या तहसील कार्यालयासाठी मॉड्यूलर कार्यालय बनविण्याचे कंत्राट घेतले होते, ज्यांचे काम राकेश यांच्यासह इतर पाच आरोपींमध्ये देखरेखीखाली सुरु होते.

उत्तमचा मोठा भाऊ तपन आणि त्याची पत्नी रुपा यांनी उत्तमला उदयपूर येथे पाठवले आणि राकेश व त्याच्या 4 साथीदारांना दीड लाखांची खंडणी देऊन त्याला जिवे मारण्याची सुपारी दिला. उत्तम उदयपुरात आल्यानंतर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली आणि उत्तमला मारहाण केली आणि त्याचा मृतदेह उदयसागर तलावाच्या काठावर फेकला.

पोलिस पहिल्यांदा आरोपीपर्यंत पोहोचले त्यानंतर अशा प्रकारची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी थेट आसामला जात उत्तम दासच्या गावाकडील घरी चौकशी केली, या चौकशीनंतर त्यांच्या हाती एक एक पुरावा मिळू लागला, त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराचा खुलासा केला.

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तमची हत्या केल्यानंतर, कायद्यानुसार उत्तमची संपत्ती त्याच्या पत्नीला मिळणार होती, तसेच त्याच्या विमा पॉलिसीचा लाभही तिला मिळणार होता. मात्र बराच काळ लोटल्यानंतरही उत्तम मृत्यूचे प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे रुपाला उत्तमच्या मालमत्तेचा आणि विमा योजनांचा लाभ मिळू शकला नाही.

उत्तमची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तसेच इतर फायदे मिळवण्यासाठी रुपाला मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी ती उदयपुरातील काही मध्यस्त तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. हे मृत्यूपत्र बनवणाऱ्या लोकांवरच पोलिसांना शंका आल्याने तपन आणि रुपाने केलेलया या धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड झाला.

थोडक्यात बातम्या-

भारताच्या सागरी सीमेत अमेरिकन नौदलाची घुसखोरी; भारत-अमेरिकेतील संबंधांवर परिणाम?

‘त्यानं फक्त माझा वापर केला’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला मोठा गौप्यस्फोट

धक्कादायक! 2 वर्षाच्या चिमुकलीचं अल्पवयीन मुलाने केलं लैंगिक शोषण

धावत्या रिक्षात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; रिक्षा न थांबवल्यानं महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल

जगप्रसिद्ध TESLA भारतात कार विकायला सज्ज, पहिल्यांदा ‘या’ तीन शहरांमध्ये गाड्या मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More