बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केलंय.

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली आहे.

नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

चीननं कसा केला भारताचा विश्वासघात?, भारतीय जवानांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महत्वाच्या बातम्या-

सुशांतचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या टीमनं घेतला मोठा निर्णय

भारत कोरोनाचं संकट संधीमध्ये बदलेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

…तर ही विधानपरिषदेची ब्याद मला नकोच- राजू शेट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More