Top News औरंगाबाद

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात

औरंगाबाद | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. यासंदर्भात आजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केलीये.

बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी काँग्रेसमध्येम मतभेद असल्याचं म्हटलं जातंय.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “औरंगाबादचं नाव बदलण्याचा अजेंडा काँग्रेलसा मान्य नाहीये. महाविकास आघाडी सरकारची स्थापना विकासाच्या मुद्द्यावर झाली आहे. यामध्ये हा अजेंडा नाही. त्यामुळे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करतोय.”

थोरात पुढे म्हणाले, “नाव बदलण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. नाव बदल करून काही होऊ शकत नाही. विकास कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे. शिवाय असा प्रस्ताव शिवसेना आणणार नसल्याची मला खात्री आहे.”

थोडक्यात बातम्या-

क्रेटाला टक्कर देण्यासाठी MG सज्ज; येतेय ही जबरदस्त कार, पाहा लूक आणि फिचर्स

पती दिल्लीला; बॉयफ्रेंडलाही आला अनैतिक संबंधाचा संशय, घडला धक्कादायक प्रकार

सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं, एल्गार परिषद होणारच- बी. जी. कोळसे पाटील

वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या