Top News महाराष्ट्र मुंबई

21 दिवस ‘भारत बंद’ हे पाऊल योग्य… पण गरिबांनी कसं जगायचं? काँग्रेससह राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची सर्वात मोठी घोषणा केली. देशाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी हा निर्णय लागू असेल, असं ते यावेळी म्हणाले. मात्र त्यांच्या या संबोधनानंतर 21 दिवस गरिबांनी कसं जगायचं? त्यांच्या पोटापाण्याचं काय? असे सवाल काँग्रससह राष्ट्रवादीने केले आहेत.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींनर निशाणा साधला आहे. 21 दिवस भारत बंद हा निर्णय आवश्य होता परंतू फक्त भाषणबाजीने काम कसं चालेलं? 21 दिवस सोडा एक दिवस तरी गरीबांनी कसं जगायचं? गरीबांना तसंच मध्यमवर्गियांना, शेतकरी आणि कामगारांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर निशाणा साधलाय. मोदींनी 21 दिवस भारत बंदचा योग्य निर्णय घेतला आहे. परंतू शेतकरी, हातावर पोट असलेले तसंच कामगार यांच्याविषयी त्यांनी अधिक स्पष्टपणे बोलण्याची गरज होती. या सगळ्यांच्या जगण्याचा विचार करावा लागेल, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू राहिलं. पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतोय, पुढील 21 दिवस काहीही करु नका. फक्त आणि फक्त घरात बसा, असं मोदी म्हणाले.

 

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज- नरेंद्र मोदी

…तर भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल; पंतप्रधान मोदींचा इशारा

आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या