Top News आरोग्य कोरोना पुणे

कोरोना- पुण्यात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक रूग्णांना डिस्चार्ज

पुणे | देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरं होण्याच्या प्रमाणात बर्‍यापैकी वाढ झालेली दिलीये. दरम्यान, पुण्यात गेल्या 24 तासात 1142 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आज दिवसभरात 1177 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 42 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर यामध्ये 15 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. यामुळे आता पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1683 पर्यंत जाऊन पोहचला आहे.

सध्या पुणे शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71503 एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल 55,100 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. या बरं झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 14720 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 750 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 467 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.

राज्यात आज 10484 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 401442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70.09 % एवढं झालंय. याशिवाय 12608 नवीन रुग्णांचं निदान करण्यात आलंय. त्याचप्रमाणे एकूण 151555 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज 364 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालीये. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.39 % एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पार्थ प्रकरणावर रोहित पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…..

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या