बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णाची दारुपार्टी; बायको-वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धरलं अन्…

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर कोरोनारूग्णांची सेवा करत आहेत. सरकारने काही नियम-अटी दिल्या आहेत मात्र काही बेजबाबदार लोक त्यांचं पालन करत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच एका कोरोनाबाधिताने दारू पिऊन धिंगाणा घातलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कोरोना झालेल्या एकाने दारू पिली आणि तो पुर्ण नशेत होता. त्याला स्वत: चालता येत नव्हतं. दारू पिऊन हा कोरोनाबाधित कॉलनीमध्ये शिरला त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. मग कोरोनाबाधिताच्या पत्नीने आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून रूग्णवाहिकेत ठेवलं.

दारूच्या नशेत असल्यामुळे कोविड सेंटर वाल्यांनी त्याला तिथे ठेवण्यास नकार दर्शवला. त्यानंतर त्याला होम आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं. कोरोनाची गंभीर स्थिती बाहेर असताना अशा प्रकारे दारू पिऊन गोंधळ घालणारी काही समाजकंटकही आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: काळजी घेऊन कोरोनाचे नियम तोडू नयेत. लोकांची सेवा करणारे डॉक्टर आणि नर्स ही सुद्धा माणसं आहेत, याचं प्रत्येकाने भान ठेवायला हवं.

थोडक्यात बातम्या- 

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावाचा घ्यावा सर्वांनी आदर्श, एकालाही नाही झाली कोरोनाची लागण

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी तीन दिवसांचा लॉकडाउन वाढवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More