नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जगभरात कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. भारतामध्ये सद्यस्थितीत इंजेक्शनद्वारे लसीकरण सुरू आहे. त्यातच आता नाकावाटेही लस देण्यात येणार आहे.
भारत बायोटेकच्या Intranasal Booster Dose च्या ट्रायलला ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडून परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआयच्या एक्सपर्ट कमिटीने कंपनीच्या इन्ट्रानेझल कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील बूस्टर डोसच्या ट्रायलकरिता प्राथमिक मंजुरी दिली आहे.
भारतातील ही पहिली नाकावाटे दिली जाणारी लस असणार आहे. ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या इतर व्हेरियंटवर ही लस प्रभावी आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. नझल व्हॅक्सिनबाबत बोलताना ‘संपुर्ण जगाला अशी लस हवी आहे. संसर्ग रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे’, असं भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, कोरोना लसींच्या दोन्ही डोसनंतर तिसरा डोस देण्याची ही योग्य वेळ आहे. बरेच लोक इम्युनोलॉजीची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारत बायोटेकने ती मिळवली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यातच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीला लसी आर्थिकदृष्ट्य़ा कमी किंमतीमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘…सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं’; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल
मोठी बातमी! नितेश राणे न्यायालयासमोर शरण, म्हणाले…
भाजपच्या आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर राऊतांची नाराजी, म्हणाले….
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Comments are closed.