बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानभवनावर कोरोनाचं सावट; तब्बल एवढे कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

मुंबई |  दोन दिवसांपुर्वी विधानसभेच्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानुसार आता 36 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोनाची लक्षणं आढळल्याने मी कोरोनाची चाचणी केली आणि माझा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून सांगितलं तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेऊन कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी यामार्फत केलं आहे.

गेल्या काही दिवसात राजकीय पक्षांचे नेते मंत्री यांना कोरोना झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असतानाच आज अर्थसंकल्प सादर होण्याआधी विधानसभेच्या 36 कर्मचारी आणि नेत्यांना कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत असताना अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

विधान भवनात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान कोरोना विधानभवनात पोहोचल्याने आता एकच खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात एकूण 11 हजार 141 एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आता विधानभवनातील एवढा मोठा आकडा पाहून प्रशासनाचे त्याला रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. नुकतेच काही नेते मंडळी कोरोना तून मुक्त होत असताना पुन्हा काही नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची बाधा होत असल्याने चिंतेचं वातावरण पसरला आहे.

थोडक्यात बातम्या –

“कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल”

सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल

राफेलचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

 महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More