भोपाळ | सरणावर ठेवलेली व्यक्ती चक्क उठून पाणी पिल्याची अजब घटना मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे घडली आहे. राजेश उर्फ टिल्लू कोल असं या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
दारुचं अतिसेवन केल्यानं त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं होतं, त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होवू लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या अंत्यविधीला सुरुवात झाल्यानंतर मृतदेहाच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष गेले, तेव्हा राजेश खोकू लागले. हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सरणावरून उचलले आणि जवळच्या एका बाकावर ठेवले, तेव्हा ते अर्धा ग्लास पाणी प्यायले.
पण त्यानंतर ते बऱ्याच वेळ बसून होते, त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ईसीजीही हा काढण्यात आला. पण त्यांचा अर्ध्या तासांने पुन्हा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या–
-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल
-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
Comments are closed.