Top News देश

शेतकरी जनसंवादादरम्यान सिंघू सीमेवर काँग्रेसच्या ‘या’ खासदारावर प्राणघातक हल्ला

नवी दिल्ली | शेतकऱ्यांसाठी आयाेजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लुधियाणा येथील काँग्रेसचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांची पगडीही काढून फेकण्यात आली असून, त्यांच्या वाहनाचीही ताेडफाेड करण्यात आली.

सिंघू सीमेवर विविध संस्थांनी शेतकऱ्यांसंदर्भात आयाेजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात रवनीतसिंग उपस्थित हाेते. त्यावेळी त्यांच्यावर एका समूहाने हल्ला केला. या घटनेबाबत रवनीतसिंग यांनी साेशल मीडियावरुन माहिती दिली.

हल्ला करणारे गुंड प्रवृत्तीचे लाेक आहेत. माझी हत्या करण्याचा हा कट हाेता. ते चार जण हाेते. त्यापैकी एकाने शर्टच्या आतून शस्त्र काढण्याचा प्रयत्न केला असल्याचं,रवनीतसिंग यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, त्या कार्यक्रमात रवनीतसिंग यांच्यासोबत अमृतसर येथील काँग्रेसचे खासदार गुरजितसिंग औजला आणि आमदार कुलबीरसिंग झिरा हेदेखील कार्यक्रमाला हजर हाेते. त्यांचीही पगडी फेकण्यात आली.

थोडक्यात बातम्या-

पद्मश्रीसाठी संजय राऊंतांच्या नावाची ठाकरे सरकारने केली होती शिफारस

हेच का आपलं प्रजासत्ताक? केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेतलं असतं तर…

प्रजासत्ताकदिनी जवानांच्या परेडनंतर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर परेड

खडसे आरोपी नाहीत त्यांना फक्त चौकशीसाठी बोलावलं- ईडी

“राहुल गांधींना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या