स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

न्यूयाॅर्क | मार्वल काॅमिक्स आणि स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना अस्तित्वात आणणाऱ्या स्टॅन ली यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. 

मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये ‘मार्वल काॅमिक्स’सह ‘द फॅन्टॅस्टीक फोर’ ची सुरूवात केली होती. त्यानंतर त्यात स्पायडर मॅन, हल्क, आयर्न मॅन, थोर, कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुपर हिरोंचा समावेश करण्यात आला.

या व्यक्तीरेखांवर नंतर चित्रपटही बनले, ज्यांनी बाॅक्स आॅफिसवर रिकाॅर्ड ब्रेक कमाई करुन दिली. स्टॅन ली यांच्या काॅमिक्सचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.  

स्टॅन ली यांनी पहिला सुपर हिरो चित्रपट ‘चक्र: द इन्विजीबल’ कार्टून नेटवर्कवर लाँच केला होता. या सिनेमाची कहाणी मुंबईमध्ये राहणाऱ्या राजू राय या तरुणावर बेतलेली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

-असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!

-राजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही!

-#MeToo | एखादं नातं खराब असेल तर ते #MeToo नाही; कुक्कु नवाजुद्दीनच्या पाठीशी