‘दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही’, शिवसेनेची बोचरी टीका
मुंबई | शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (MNS) टीका करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यावरून दीपाली सय्यद यांनी आणखी एकदा टीका केली आहे.
घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशी टीका देखील दीपाली सय्यद यांनी केली होती. यानंतर ट्विट करत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे व मनसेवर निशाणा साधला आहे.
केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनता येणार नाही, अशा खोचक शब्दात दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
दरम्यान, मोदींचे कौतुक करून काय भेटणार. ब्रिजभुषण काय तुमच्यासारखा भूमिका बदलत नाही, अशी टीकाही दीपाली सय्यद यांनी केली आहे. दीपाली सय्यद यांच्या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देणार हे बघावं लागेल.
केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनतां येणार नाही. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही. मोदींचे कौतुक करून काय भेटणार ब्रिजभूषण काय तुमच्या सारखा भुमिका बदलत नाही. @ShivSena @mnsadhikrut
— Deepali Sayed (@deepalisayed) May 22, 2022
थोडक्यात बातम्या-
‘अमरावतीची भाकरवडी’ म्हणत दीपाली संय्यद यांचा नवनीत राणांवर घणाघात, म्हणाल्या…
“अजित पवार आज सत्तेत आहेत उद्या नसतील, पण फडणवीस सत्तेत आल्यावर…”
देशात मंकीपॉक्सची दहशत, केंद्र सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात बारामतीचा विकास झाला”
“…तर संभाजीराजे छत्रपतींना संजय राऊतांची सेफ जागा द्या”
Comments are closed.