बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबच्या गोलंंदाजांवर गब्बर दहाडला; दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

मुंबई | आयपीएलचा 11वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. पंजाबने दिलेलं 196 धावांच टार्गेट शिखर धवनच्या दमदार खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने आरामात पूर्ण केलं. शिखर धवन पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडला. शिखरच्या या खेळीमुळे दिल्लीने या हंगामातील दुसरा विजय मिळवला आहे.

सर्वप्रथम दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजी करण्याचं आवाहन केलं. पंजाबची सुरूवात चांगली झाली. बर्थडे बॉय केएल राहुलने सलामवीर मयंक अग्रवालसोबत 122 धावांची सलामी भागेदारी केली. यात मयंक अग्रवालने 36 चेंडूत 69 धावा केल्या. त्यात त्याने 7 चौकर आणि 4 षटकार खेचले. मयंक आणि राहुल बाद झाल्यानंतर दीपक हुडा आणि शाहरुख खानने यांनी धावसंख्या 195 पर्यंत पोहोचवली. मयंक आणि राहुल खेळत होते तोपर्यंत सामन्यावर पंजाबची पकड होती.

पंजाबने दिलेल्या 196 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची देखील सुरवात चांगली झाली. सलामवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने पॉवर प्लेमध्ये 10च्या रनरेटने धावा काढल्या. त्यानंतर शिखरने मागे न बघता आपली फटकेबाजी चालू ठेवली. कर्णधार रिषभ पंतने त्याला चांगली साथ दिली. शिखरने या सामन्यात 49 चेंडूत 92 धावा केल्या आहेत. यात त्याने 13 चौकर आणि 2 षटकार मारले. यासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरवण्यात आले. अखेर उर्वरित काम मार्कंस स्टोनिसने पूर्ण केलं आणि दिल्लीचा विजय झाला.

दरम्यान, या सामन्यात दोन्ही बाजूने फलंदाजांच्या दबदबा राहिला. पण अखेर राहुल आणि मयंकच्या खेळीवर एकट्या शिखर धवनची खेळी भारी पडली. या सामन्यात शिखर धवन पुन्हा 90+ धावसंख्येवर बाद झाला. 92 आणि 98 ही धावसंख्या त्याच्यासाठी घातक मानली जाते. याआधीही भारताकडून खेळताना तो बऱ्याच वेळा 90+ धावांवर बाद झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More