बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

मुंबई | केंद्रीय निवडणुक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी भाकीत केलं होतं. पवारांनी केलेल्या त्या भाकीतावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी असं भाकीत अनेक नेते करत होते की भाजपला फक्त 180 जागा मिळतील पण अगोदरपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. या निवडणुकांमध्येही भाजप हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून आपल्या समोर येईल हा मला विश्वास असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील नागरिक स्वाभिमानी असून बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर संपूर्ण बंगाल एकसंघ होतो, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. बारामतीतील माळेगाव तालुक्यातील गोविंदबाग या निवस्थानी माध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान, तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर भाजप केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांपैकी फक्त आसाममध्ये सत्ता येऊ शकते असते, असं पवार म्हणाले होेते.

थोडक्यात बातम्या- 

आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीने उचललं धक्कादायक पाऊल

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट

ही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस

झोमॅटो प्रकरणात खऱ्या-खोटाचा ‘हा’ व्हीडिओ आता होतोय प्रचंड व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More