बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं आता…”

मुंबई | बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतो, आता माझं वजन 102 किलो आहे. आता, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आम्ही फाईव्ह स्टार राजकारण केलं नाही, आम्ही मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्मवर झोपलो, फुटपाथवर झोपलो, तिकीट काढायलाही पैसे नव्हते, असं फडणवीसांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

अरे मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू? अरे हो, मी गेलो होतो बाबरी पाडण्यासाठी याचा मला अभिमान आहे, असंही फडणवीस म्हणालेत.

 थोडक्यात बातम्या-  

“आमचे असे मुख्यमंत्री आहेत की, एकही भाषण विकासावर नाही”

काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….

‘…अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा

“पुढील 25 वर्षे शिवसेनाचा मुख्यमंत्री राहिल असं काम करा”

केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More