मुख्यमंत्र्यांनी ज्या योजनेमुळे पाठ थोपटून घेतली ती योजना फसली आहे- धनंजय मुंडे

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या जलयुक्त शिवाराच्या नावाने आपली पाठ थोपटून घेतली आहे, ती योजना पुर्णत फसली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्यावतीने मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर केली.

साडे सात हजार रूपये जलयुक्त शिवारावर खर्च झाले. त्यांचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून जमणार नाही, तर सरसरकट दुष्काळ जाहीर करावा, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!

-जलसंधारण मंत्री राम शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली न्याहारी

-#MeToo | आणखी एका अभिनेत्रीचा लैगिंक शोषणाचा आरोप

-यातली सासू कोण? आणि सून कोण? लोणारमध्ये राज ठाकरेंचा सवाल

-ड्वेन ब्राव्हो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या