महाराष्ट्र मुंबई

मुंडे साहेबांचा अपघात झाला की घात? हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना पडलेला प्रश्न- धनंजय मुंडे

मुंबई | गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन अपघात झाल्यामुळं झालं की घात झाला? हा प्रश्न त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

मुंडे साहेंबावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या मनात त्यांच्या निधनाबद्दल शंका आहे तशी माझ्या मनात देखील आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

सामान्य जनतेला मुंडे साहेबांच्या निधनाबद्दल सीबीआयनं दिलेला अहवाल मान्य नाही, सरकार मुडें साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेचं समाधान करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात राष्ट्रवदी काँग्रेसला यश मिळेल, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“…तर त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात टाकू”

“डोनाल्ड ट्रंम्प यांनीही केली नरेंद्र मोदींच्या राज्यकारभाराची प्रशंसा”

…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस

भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?

तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या