बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात डिझेलची शंभरी पार तर दुसरीकडे पुणेकरांचा रिक्षाप्रवासही महागला

पुणे | पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून सामान्य नागरिक चिंतेत आहेत. मात्र या इंधनांचे दर काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. उलट हे दर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. त्यातच आता मुंबई नंतर पुणे शहरातही डिझेलने शंभरी ओलांडली आहे. तर दुसरीकडे रिक्षाप्रवास 2 रुपयांनी महागला आहे.

पुण्यात डिझेलचा दर 100 रुपये 8 पैसे प्रतिलीटर झाला आहे. तर पेट्रोल 110 रुपये 92 पैसे प्रतिलीटर आहे. देशातील सध्याचे इंधनाचे दर हे आत्तापर्यंत सर्वाधिक आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. पुण्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलेली होतीच. मात्र आता डिझेलनेही शंभरी पार केल्याने पुणेकर चिंतेत आहेत.

याशिवाय पुणे शहरात रिक्षाप्रवासाचेही दर वाढले आहेत. पहिल्या दिड किलोमीटरसाठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 13 रुपये दर आकारले जाणार आहेत.  येत्या 8 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. ही भाडेवाढ पुणे, पिंपरी- चिंचवड आणि बारामती हद्दीसाठी असणार आहे.

एकंदरीतच पेट्रोलच्या दरात वाढ तर सातत्याने सुरू आहेच. शिवाय घरगुती गॅसदेखील महागले आहेत. त्यातच आता रिक्षाच्या भाड्यातही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे आधीच महागाईमुळे चिंतेत असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही दरवाढ कंबरडं मोडणारी ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

“हिंदूहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, परिक्षा केंद्रावरून पुन्हा गोंधळ

“…तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत?”

“आता आत्मविश्वासाने सांगतो आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी अगदी स्पष्टपणे दिसत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More