मुंबई | देशाला खूप चांगल्या तरूण नेतृत्वाची गरज आहे. आदित्य ठाकरे माझा खूप चांगला मित्र आहे. त्याच्यासारखा तरूण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच मोठी गोष्ट आहे, अशी स्तुतीसुमनं दिशा पटानीने आदित्य यांच्यावर उधळली आहेत. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
दिशा पटानीने आदित्य यांच्या पर्यावरण खात्याच्या कामाबद्दलही भरभरून स्तुती केली आहे. आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी बरंच मोठं काम करत आहे. त्याने खास करून जंगल वाचवण्यासाठी चांगले पाऊल उचललं आहे, असंही ती म्हणाली आहे.
दिशाने सरकारने घेतलेल्या मुंबईच्या नाईट लाईफवरही आपलं मत व्यक्त केलं. मुंबईच्या नाईटलाईफचा घेतलेला निर्णय हा निश्चित स्वागतार्ह आहे. आदित्यने नाईट लाईफ संकल्पनेवर बरीच मेहनत घेतल्याचं तिनं म्हटलं.
दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांची मैत्री चांगलीच चर्चेत आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चाही सोशल मीडियावर होत असते.
ट्रेंडिंग बातम्या-
…म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन- राज ठाकरे
“महिला आणि लहान मुले नसते तर 2 तासात शाहीन बाग रिकामं केलं असतं”
महत्वाच्या बातम्या-
डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भातील अफवांनी कोल्हे संतापले
Comments are closed.